सर्वोच्च न्यायालयाने आज गर्भपाताबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. महिला विवाहित असो वा अविवाहित तिच्या इच्छेने लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा झाल्यास सुरक्षित गर्भपाताचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने तिला दिला आहे. विशेषता अविवाहित महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणे असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
“सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे”. 2021 मध्ये केलेल्या कायद्यात विवाहित आणि अविवाहित असा फरक केलेला नाही. महिलांना गर्भपाताचा निर्णय घेण्याचा संपूर्ण स्वतंत्र असला पाहिजे. हा अधिकार विवाहित किंवा अविवाहित महिलांना आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार प्रत्येकाला 22 ते 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार आहे. गर्भपाताचा अधिकार केवळ विवाहित महिलांना देऊन अविवाहित महिलांना त्यापासून वंचित ठेवल्यास संविधानातील कलम 14चा भंग होईल, असेही सर्वोच्च न्यायालयने म्हटले आहे.
का घ्यावा लागला हा निर्णय ?
एका 25 वर्षीय अविवाहित महिलेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. गर्भधारणेच्या 24 आठवड्यानंतर या महिलेने गर्भपात करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या महिलेची मागणी फेटाळून लावली. तिने स्व-इच्छेने शारीरिक संबंध निर्माण केल्यामुळे ती गरोदर राहिली पण तिच्या जोडीदाराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिला गर्भपात करायचा होता, असे महिलेने उच्च न्यायालयात सांगितले होते.
त्यांनतर त्या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली एम्सने स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाच्या देखरेखीखाली गर्भपाताला परवानगी देण्यात आली होती. महिलेचा जीव धोक्यात न घालता गर्भपात करता येतो, असा निष्कर्ष काढण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | “अशोक चव्हाण यांची एक क्लिप जाहीर केली तर…”, आशिष शेलारांचा इशारा
- Supriya Sule | “वर्षभरात केवळ १५ सिलिंडर मिळणार?” ; सुप्रिया सुळेंची आक्रमक पोस्ट
- Honda Bike | होंडा देत आहे आपल्या बाइक्सवर खास फेस्टिव्ह ऑफर
- IAS | “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, महिला आधिकाऱ्याचं संतापजनक वक्तव्य
- Viral Video | ‘ही’ व्यक्ती रबराप्रमाणे वळवते आपले शरीर, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!
- Ashok Chavan | एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या भूमिकेवर अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, “२०१४ मध्येच…”


