Share

Supriya Sule | “वर्षभरात केवळ १५ सिलिंडर मिळणार?” ; सुप्रिया सुळेंची आक्रमक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आता ग्राहकांसाठी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची संख्या निश्चित करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार आता ग्राहकांना वर्षभरात फक्त 15 सिलिंडर खरेदी करता येणार आहेत. कोणत्याही ग्राहकाला एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. याशिवाय ग्राहकांना महिन्यात फक्त दोनच सिलिंडर घेता येणार आहेत. ग्राहकांना २ पेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाहीत. आतापर्यंत सिलिंडर मिळविण्यासाठी महिन्याचा किंवा वर्षाचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदी सरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचं काम केलंय. एकीकडे एलपीजी गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची, यातून केंद्र सरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येतं. केंद्राच्या नव्या नियमानुसार उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी नसलेल्या ग्राहकाला वर्षभरात केवळ १५ आणि अनुदानित असलेल्या ग्राहकाला १२ तर दोघांसाठीही महिन्याचा कोटा २ सिलेंडरचा करून मोदी सरकारने प्रत्येक गृहिणीच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. ही बातमी वाचण्यात आली व अक्षरशः धक्काच बसला.”

केंद्र सरकारची कार्यपध्दती कुचकामी-

तर दुसरीकडे एखाद्या ग्राहकाला जर गॅस सिलेंडरची आवश्यकता असल्यास त्यासाठी गॅस सिलेंडर कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल तसेच त्याचा पुरावा देऊन, त्यासाठी कागदपत्रे सादर करून त्यानंतरच त्या ग्राहकाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल. एकीकडे ‘ई-गव्हर्नन्सचा’ गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे अतिरिक्त गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पुन्हा नागरिकांना कागदपत्रं घेऊन खटाटोप करायला लावायचा यातून केंद्र सरकारची कार्यपध्दती किती कुचकामी आहे हेच पाहायला मिळतं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली-

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन समस्त महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली आहे. संसाराचा रहाटगाडा चालवायचा कसा असा प्रश्न आता माझ्यासह देशातील अनेक गृहिणींना पडलाय. देशात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव साजरे केले जातात. या सणावळीत विविध पक्वान्न, खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे घराघरात या काळात गॅस सिलेंडरची सर्वाधिक आवश्यकता असते. पण केंद्राच्या केवळ १५ सिलेंडरच घेण्याच्या नियमामुळे देशवासियांना मर्यादेमध्ये गॅस सिलेंडर वापरावा लागणार असून आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणारेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजप सरकारने नागरिकांच्या मुलभूत हक्कांवरच घातलं  बंधन-

केवळ सण उत्सवच नव्हे तर अनेक महिला या घरगुती डबे पुरवण्याचे काम करतात किंवा अनेक विद्यार्थी पेईंग गेस्ट किंवा समूहाने राहतात, अशांसाठी गॅस सिलेंडरची जास्त आवश्यकता असते. परंतु या निर्णयाने महिला, विद्यार्थी व पेईंग गेस्ट सारख्या सर्वांनाच चिंतेत टाकण्याचं काम मोदी सरकारने केले. देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजप सरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर, सण उत्सव साजरे करण्यावर व एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातलं आहे. एक गृहिणी म्हणून मी या निर्णयाचा जाहीर निषेध करते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!