मुंबई : कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटीलने यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला आहे. सातऱ्यात रंगलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत विशालने अंतिम फेरीत सोलापूरच्या विशाल बनकरचा पराभव केला. १९ वर्षीय पृथ्वीराजने गादी फेरीत हर्षद कोकटेचा पराभव केला होता. ६४वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली.
२१ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचा मान कोल्हापुरला मिळला आहे. याआधी कोल्हापुरला २००० साली महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली होती. यावेळी हिंद केसरी विनोद चौगुले यांना महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला होता. आज झालेल्या रोमहर्षक लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराजने विशाल बनकरचा ५-४ असा पराभव केला. या लढतीत उतरण्यापूर्वी माती विभागातून विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखला १३-१९ अशा फरकाने हरवले होते.
कोल्हापुरच्या जालिंदर आबा मुंडेंच्या शाहू कुस्ती केंद्रात पृथ्वीराजने कुस्तीचे धडे गिरवले. पुण्यात आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये अमर निंबाळकर आणि राम पवार सयांनी यांच्या हाताखाली पृथ्वी परिश्रम घेत होता. तो आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 RCB vs MI : रोहित विरुद्ध विराट..! मुंबईची पहिली बॅटिंग; दोन्ही संघात ‘मोठे’ बदल!
- “सदावर्ते यांच्यावर या पूर्वीच कारवाई होण्याची अपेक्षा होती”- विजय वडेट्टीवार
- IPL 2022 CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचा ‘चौकार’; हैदराबादचा विजयारंभ!
- “नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- आंदोलनाच्याआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलिसांनी केले मोबाइल जप्त
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


