Share

“नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या मुद्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास विकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट केली असून ते म्हणाले आहेत की,‘ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो दुर्देवीच आहे. या प्रकारामागे कोण हे पोलीस शोधून काढतीलच. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत. खर आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही मात्र याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली. भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते?’, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2059048354268835&id=234379736735715&sfnsn=wiwspwa

पुढे ते म्हणाले की, ‘एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे, पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे, दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे, मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे, काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे, राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे, उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे, सरकारी वकिलाच्या पुढाकाराने खोटे पुरावे तयार करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवणे.’

तसेच बदल्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हेगार ठरविणे, जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे, आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपुरात महापूजेपासून रोखणं ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे उपाध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!