🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२च्या १८व्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससमोर (MI) आमनेसामने आला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना रंगत असून डु प्लेसिसने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. आरसीबीने त्यांच्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर मुंबईने तीनही सामने गमावले आहेत.
हा मोसम आरसीबीसाठी आतापर्यंत चांगला ठरला आहे. डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघ खूपच संतुलित दिसत असून विराट कोहली फॉर्ममध्ये आला तर संघ खूप मजबूत होईल. या सामन्यात मॅक्सवेलही पुनरागमन करत आहे. दुसरीकडे मुंबई संघासमोर अनेक समस्या आहेत. रोहित शर्माचा फॉर्मही खराब असताना गोलंदाजी विभागही आतापर्यंत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत रोहित कोणता प्लॅन आणतो हे पाहावे लागेल. आज मुंबई संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कायरन पोलार्ड आणि डेवाल्ड ब्रेविस हे फक्त दोन विदेशी खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे.
दोन्ही संघांची Playing XI
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी.
महत्त्वाच्या बातम्या –
- “सदावर्ते यांच्यावर या पूर्वीच कारवाई होण्याची अपेक्षा होती”- विजय वडेट्टीवार
- IPL 2022 CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचा ‘चौकार’; हैदराबादचा विजयारंभ!
- “नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- आंदोलनाच्याआधी शरद पवारांच्या घराची रेकी, पोलिसांनी केले मोबाइल जप्त
- “हो, आमची भाषा तशीच असेल पण तुमच्या…”- संजय राऊत
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
