Share

“महाराष्ट्राने असा लुच्चा मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नाही” ; परबांवर बोलताना किरीट सोमय्यांची जीभ घसरली

Published On: 

🕒 1 min read

 

मुबई : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल गुरुवारी जवळपास १३ ते १४ तास कसून चौकशी केली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. सदानंद कदम यांच्या मालकीच्या दापोली तालुक्यातील रिसॉर्टमधील सांडपाणी थेट समुद्रात जात असल्याच्या तक्रारीवरून माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित माणसांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटत आहेत. अशातच अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्याने हा वाद विकोपाला जाण्याचे दिसत आहेत. सोमय्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचं म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरं का दिली जात नाहीत,” असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

“ईडी अधिकारी नेमके कशासाठी आले होते हे आपल्याला माहिती नाही, माझा संबंधित रिसॉर्टशी काही संबंध नाही, असं अनिल परब म्हणत आहेत. १७ डिसेंबर २०२० ची पावती माझ्याकडे आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अनिल परब परिवहनमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला होता. तो मी नव्हेच नाट्यकार अनिल परब यांनी याचं उत्तर द्यावं. याआधी सुद्धा अनिल परब यांनी सर्व कर भरले होते. रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या मालकीचा असेल तर तुम्ही का कर भरत होतात?” असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

“१६ हजार ६८३ स्क्वेअर फिटचं बांधकाम असून घर क्रमांक १०६२ यांच्या मालकीचं आहे. ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव २५ कोटी रुपये आहे. आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही सांगतात, अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल,” असा खोचक टोला ही त्यांनी लगावला.

“उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवलं असं सांगतात,” असे देखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!