ज्या ठिकाणी भाजपला त्यांची गरज असते, ओवेसी त्या ठिकाणी जात असतात – संजय राऊत
मुंबई : जोपर्यंत ओवेसी भिवंडीत येऊन कायद्याचे उल्लंघन करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर बंधने लादता येणार नाहीत. पण हा विषय पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने घ्यायचा असतो. त्यावर मी बोलणे योग्य नाही.
ओवेसी हे पूर्ण देशात फिरत असतात असे संजय राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी ओवेसिंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.