Share

Women’s T20 Challenge 2022 : भारताला मिळाली ‘लेडी’ धोनी..! महाराष्ट्राच्या किरण नवगिरेवर ‘माही’चा प्रभाव; एकदा वाचाच!

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राची फलंदाज किरण नवगिरेने आपल्या पदार्पणाच्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या (Women’s T20 Challenge 2022) सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकले. तिने स्फोटक खेळी केली आणि सर्वांची वाहवा मिळवली. किरणने व्हेलॉसिटीसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावले आणि तिची ३४ चेंडूत ६९ धावांची खेळी दीर्घकाळ स्मरणात राहील. या खेळीत त्याने पाच षटकार मारले. संघसहकारी यस्तिका भाटियाशी बोलताना किरण म्हणाली, “जेव्हा मी षटकार मारते आणि नेट्समध्ये सराव करते तेव्हा मला खूप छान वाटते. मी धोनी सरांचा खेळ पाहते आणि त्यांच्यासारखे सामने फिनीश करायला आवडतात.”

धोनीचा २०११चा वर्ल्डकप जिंकवणारा षटकार भारतीयांच्या हृदयावर कोरला गेला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीच्या नाबाद ९१ धावांनी किरणचे आयुष्यच बदलून गेले. कारण पूर्वी ती ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डीकडे जास्त लक्ष द्यायची आणि सोलापूर जिल्ह्यातील मिरे गावात वडिलांना शेतात मदत करायची.

या फटक्याने सोलापूरची खेळाडू किरण नवगिरेसह अनेकांचे आयुष्य बदलले. या सामन्यानंतर ११ वर्षांनी किरण नागालँडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. किरण म्हणाली, ”मी २०२२च्या विश्वचषकाची फायनल पाहिली आणि धोनी सरांच्या त्या षटकाराने मला प्रेरणा मिळाली. त्यांनी माझ्या मनावर छाप सोडली. त्या षटकाराने मला प्रेरणा दिली आणि मला असे वाटते की मी प्रत्येक सामन्यात असे षटकार ठोकू शकते.”

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!