🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात निर्णायक सामना होणार आहे. हा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल जिथे त्यांचा सामना २९ मे रोजी गुजरात टायटन्सशी होईल. पण या सामन्यात सर्वांच्या नजरा राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या वानिंदू हसरंगा यांच्यावर असतील. हे दोन्ही खेळाडू पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. आयपीएलच्या २०२२ व्या हंगामात चहलच्या नावावर २६, तर हसरंगाने २५ विकेट्स घेतल्या आहेत.
दोन फिरकी गोलंदाज भिडणार
क्वालीफायर २ च्या सामन्यात या दोन गोलंदाजांची कामगिरी त्यांच्या संघासाठी निर्णायक असेल कारण दोघेही मॅच-विनर आहेत आणि मधल्या षटकांमध्ये चुरशीने गोलंदाजी करून विरोधी गोलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यात यशस्वी झाले आहेत.
चहल अव्वलस्थानी
युजवेंद्र चहलने आयपीएल २०२२ च्या हंगामात राजस्थान रॉयल संघासाठी महत्वाचा गोलंदाज म्हणून भूमिका बजावली आहे. त्याच्या कामगिरीमुळे संघाने अनेक सामन्यात विजय नोंदवला आहे. चहलने यंदाच्या हंगामात खेळलेल्या १५ सामन्यांत १६.७६ च्या सरासरीने २६ बळी मिळवले आहेत. चहलने आयपीएल हंगामाच्या सुरवातीपासूनच पर्पल कॅपवर ताबा कायम ठेवला आहे. चहाची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ४० धावात ५ बळी अशी आहे.
वनिंदू हसरंगा देतोय दमदार टक्कर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगाने यंदाच्या आयपीएल हंगामात खेळलेल्या १५ सामन्यांत २५ बळी मिळवले आहेत. अनेक महत्त्वाच्या सामन्यामध्ये हसरंगाने बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला आहे. यंदाच्या हंगामातील चहलनंतर सर्वाधिक यशस्वी गोलंदाज हसरंगा आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक प्रदर्शन १८ धावांत ५ बळी असे आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
