औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादावर औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. ‘बँकांच्या कर्जाचे हप्ते, वीजबिल, पालिका कर, इंधनावरील कर कमी करणे, कोरोना रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार आदींबाबत महत्त्वाच्या घोषणा करुन जनतेला दिलासा देतील असे वाटले होते. पण मोदींप्रमाणेच तुम्हीही फक्त बडबडच केली’, अशी टीका त्यांनी ट्विट करुन केली आहे.
I thought Mr CM will make an announcement giving relaxation on – bank loan instalments, power tariff, municipal taxes, slashing taxes on fuel, free treatment to all covid patients even in private hospitals etc etc. But you did exactly what Mr Modi is best at : blah blah blah! https://t.co/ZDiu9ANUzE
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) May 30, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जलील यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन एक जूनपासून सर्व प्रकारचे उद्योगधंदे, बाजारपेठा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाने दुकानांना लावलेले सील काढून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश द्यावेत. व्यापारी, दुकानदार, टपरीधारक सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. आस्थापना बंद असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पॅकेज किंवा करांमध्ये सवलत दिलेली नाही, उलट शहरात प्रशासनाने एक प्रकारे हुकूमशाहीच चालवली आहे.
त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही खा.जलील यांनी घणाघाती टीका केली. ‘उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू अशा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शासकीय कामात अडथळा; शिवसेना आ.प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा
- ‘महाविकास आघाडीकडून मराठा समाज आणि ओबीसींत भांडणं लावण्याचा प्रयत्न’
- ‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण
- ‘त्या’ ३० नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या केली!, गिरीश महाजनांनी मौन सोडले
- वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा


