जळगाव : ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय आत्महत्या केली असून, लवकरच भाजपमधून फुटून गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
भाजपातील बंडखोर नगरसेवकांची संख्या वाढत चालल्याने माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री ९.३० वाजता तातडीची बैठक घेतली. ५७ वरून २७ वर घसरगुंडी झालेल्या भाजपच्या २४ नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘भाजपातून फुटणारे नगरसेवक राजकीय आत्महत्या करीत असून त्यांचे राजकीय अस्तित्व संपणार आहे. ज्या नगरसेवकांना पक्षाचे तिकिट देवून निवडून आले ते आयुष्यात नगरसेवक होऊ शकले नसते. सत्ता येते आणि जाते; परंतु फुटणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार हे अटळ आहे असा इशारा आमदार महाजनांनी दिला.
महाजन यांनी या बैठकीनंतर काही नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चादेखील केली. तसेच महापालिकेत सत्ता आणण्यासाठी पक्षाने जे प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांवर काही पैशांसाठी पाणी फिरू देऊ नका, असेही आवाहन महाजन यांनी केले. दरम्यान, १ जून रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नगरसेवकांना काही सूचना दिल्या
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा
- ‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका
- केरळमध्ये मुस्लिमांना ८० टक्के शिष्यवृत्तीचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द
- ‘ठाकरे सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी आरक्षण गमावले’, माजी मंत्री बावनकुळे यांची टीका
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

