जळगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच गर्दी न करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरीदेखील हनुमाननगर परिसरात एका तरुणाने थेट वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत पोलिस पोहोचल्यामुळे ‘बर्थ डे बॉय’सह जमावावर गुन्हा दाखल करून त्यांना ‘ट्रीट’ देण्यात आली. हा प्रकार २८ मे रोजी रात्री ८ वाजता घडला.
रामेश्वर कॉलनीत अनिल लक्ष्मण घुले याचा २८ रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने घुलेने अयोध्यानगरातील हनुमान मंदिर परिसरात सार्वजनिक जागेवर पार्टीचे आयोजन केले होते. ही माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ‘बर्थडे बॉय’ अनिल घुले, सुनील घुले (दोघे रा. रामेश्वर कॉलनी), रूपेश सोनार (रा. कांचनगर), सोनूसिंग बावरी (रा. तांबापुरा), दत्तू थोरवे, मयूर वाणी, संदीप उर्फ राधे शिरसाठ, सिकंदर पटेल, पप्पू पांडोळकर, विक्की पाटील, अक्षय पाटील, दीपक तरटे यांच्यासह १० ते १२ जणांच्या जमावावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने शहरभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंध काळातदेखील नागरिकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. निर्बंध काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांकडून मनपा प्रशासनाने तब्बल ५१ लाखांची वसुली केली आहे, तर शहरातील ४८२ दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका
- केरळमध्ये मुस्लिमांना ८० टक्के शिष्यवृत्तीचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द
- ‘ठाकरे सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी आरक्षण गमावले’, माजी मंत्री बावनकुळे यांची टीका
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक


