औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व दंड ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना २०१८ सालची आहे. जैस्वाल यांनी औरंगाबादच्या क्रांती चौकातील पोलिस ठाण्यातील काच फोडून खुर्चीही फेकली होती.
दि. ११ आणि १२ मे २०१८ रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली. या आरोपींना पोलिसांनी विनाकारण अटक केली असून त्यांना तात्काळ सोडा, अशी मागणी करत जैस्वाल आपल्या सात ते आठ समर्थकांसह क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेले आणि तिथं तोडफोड केली होती. अटक केलेल्या दोन कार्यकर्त्यांना सोडा, ही मागणी करत जैस्वाल यांनी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी, अधिकारी यांना धमकावत शिवीगाळ करत टेबलवरी काच फोडली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.एम.भोसले यांनी जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी अडीच हजार प्रमाणे पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. जैस्वाल यांनी दंड न भरल्यास शिक्षेत एक महिन्याची वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिन्याची शिक्षा असली तरी ती एकत्रच भोगावयाची आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत निवृत्ती पोटे यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात त्यांना तीन दिवस न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीकडून मराठा समाज आणि ओबीसींत भांडणं लावण्याचा प्रयत्न’
- ‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण
- ‘त्या’ ३० नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या केली!, गिरीश महाजनांनी मौन सोडले
- वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा
- ‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

