Share

‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण

Published On: 

बीड : गेवराईतील भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी अवैध वाळूविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवैध आणि बेसुमार वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे आ.पवार हे गेवराई तालुक्यातील अनेक गावांची पाहणी करत आहेत. दरम्यान, वाळूमुळे पडलेले खड्डे का दाखविले, या कारणावरुन एका तरुणास मारहाण केल्याची घटना सुरळेगावजवळील नदीपात्रात घडली. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य युध्दजित पंडितांसह चौघांवर चकलांबा पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

जनार्दन दादाभाऊ निर्मळ (३१,रा.सुरळेगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीनुसार, सुरळेगाव येथील नदीपात्रात रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ‘नदीपात्रातील वाळू टेंडरचे मोठे खड्डे आमदारांना का दाखविले’, असे म्हणून युद्धजित पंडित यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी तुला अजून काहीच केले नसून काय करील ते सांगता येत नाही’, अशी धमकी दिली.

यानंतर त्यांच्यासह शिव पंडित, किशोर पंडित व महेश पंडित यांनी काठीने आणि लोखंडी पाईपने डोक्यात, पाठीवर व पोटावर मारहाण करुन शिवीगाळ आणि खोटी केस करण्याची धमकी दिल्याचे जनार्दन निर्मळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी युद्धजित बदामराव पंडित यांच्यासह शिव पंडित, किशोर पंडित व महेश पंडित यांच्याविरुध्द चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे हे तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!