Share

जाऊ द्या ना ताई, अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील ; शेलारांचा पलटवार !

Published On: 

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेत भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल खरपूस समाचार घेतला आहे. ‘इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर, गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’, अशी मागणी करतानाच याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार’, आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला घाबरू नका. कुणी गुंडगिरी करत असल्यास रात्री अपरात्री कधीही मला फोन करा. केवळ इथलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा मला ओळखतात. म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही’, असे विधान गणेश नाईक यांनी तुर्भे येथे एका कार्यक्रमात केले होते. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. ‘आझाद काश्मीरपासून ते पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत अनेक विषय आहेत. अशा ट्रकभर चौकशा कराव्या लागतील, जाऊ द्या ना ताई,’ असं म्हणंत आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

‘गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पुजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!’ अशा आशयाचे ट्वीट करता शेलारांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!