परभणी : प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून दुचाकी चोरी केल्याची घटना सेलू येथे घडली आहे. सुरशे राऊत आणि अभिजित कुलकर्णी असे या दोन दुचाकी चोरांचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधी बोलेरो चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसल्याने या दोघांनी दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नांदेड येथील प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून सेलू येथील सुरेश राऊत आणि अभिजित कुलकर्णी या दोघांनी आधी बोलेरो चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. त्यानंतर त्यांनी नंतर एका लग्न समारंभातील दुचाकी चोरली. मात्र, तेथून जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल आणि सहायक पोलिस निरीक्षक माधव लोकुलवार हे तपासकामालाठी वालूर येथे गेले होते. दरम्यान, रात्री ८ वाजेच्या सुमारास रायगड कॉर्नर येथे एक तरुण दुचाकीसह दिसला. संशयावरून त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच, बोलेरो जीप चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचेही कबुल केले.
महत्वाच्या बातम्या
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलनिमित्त शॉर्टफिल्म स्पर्धेचं आयोजन
- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

