🕒 1 min read
पुणे- राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
ही घटना घडल्याच्या दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत.त्यांचा फोनही लागत नाही. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापलेले आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘हे सगळं एका बाजूला असताना तिचा चुलत भाऊ विलास चव्हाणही वनखात्यात नोकरीला असल्याचे समोर आले आहे. लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार,विलास जानेवारीपासून पुण्यात वास्तव्यास होता. विलास पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागात कामाला असल्याचे समोर आले आहे. तिथे तो शिपाई पदावर कार्यरत असून ८ फेब्रुवारीपासून कामावर गैरहजर असल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.
जानेवारीपासून तो तिथे नोकरीला असून त्याची थेट भरती करण्यात आलेली नाही. तो एका बाहेरील मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तिथे नोकरीला आहे. कार्यालयात त्याची वागणूक अत्यंत सामान्य होती, त्याच्याविषयी आम्हालाही बातम्यांमधूनच माहिती कळाल्याचे वनविभातील सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान या कॅबिनेट खात्याचे मंत्री संजय राठोड आहेत त्यामुळे देखील उलसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींचे जबाब पुणे पोलिसांनी नोंदवले आहेत. त्यात विलासाचाही समावेश आहे. त्यामुळे त्यात त्याने काय माहिती दिली हेही अजून समोर आलेले नाही. एकूणच या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.पुजानेच तिच्या भावाला राठोड यांच्या ओळखीचा फायदा करून घेत वनखात्यात नोकरीला लावले का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक; अपघातात दुचाकीवरील दोघे ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
