हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील असोलवाडीच्या कुक्कुटपालन केंद्रात दगावलेल्या ३०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कोबंड्यांचे नमुने चाचणीसाठी भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेने पाठवण्यात आले होते. त्यानंतर या कोबंड्यांचा बर्ड फ्लू पॉझिटिव्ह अहवाल जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता गावातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
कळमनुरी तालुक्यातील असोलवाडीत असोलवाडी येथील लक्ष्मण गुहाडे नावाच्या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून या वर्षीच कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी ३०० कोंबड्यांच्या कुक्कुटपालन केंद्राची निर्मीती केली होती. मात्र, शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी शेडजवळ गेले, तेव्हा त्यांना कुक्कुटपालन केंद्राली सर्व कोंबड्या दगावल्याचे दिसून आले.
दरम्यान, याबात कळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी गुहाडे यांच्या कुक्कुटपालन केद्राला भेट दिली. तसेच या प्रकाराची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. माधव आठवले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कोंबड्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

