🕒 1 min read
बीड : कळंब तालुक्यातील जिल्ह्यातील सावरगाव येथील लखन महादेव सोनवणे या रंगकाम करणाऱ्या तरुणाचा खून त्याच्या मित्र साईनाथ जयचंद गायकवाड याने दारू पाजून केल्याचे समोर आले आहे. वडगाव पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने खून का केला याची चौकशी पोलिस करत आहेत.
दरम्यान, १५ फेब्रुवरी रोजी केज- कळंब रोडवर साळेगाव ते माळेगाव दरम्यान तुकाराम गुंठाळ यांच्या शेतात लखन महादेव सोनवणेचा मृतदेह आढळून आला होता. तुकाराम गुंठाळ हे सकाळी शेतात गेले, तेव्हा त्यांना गव्हाच्या पिकात लखनचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.
लक्षख सोनवणे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहिवासी आहे. तो इमारतींना रंग देण्याचे काम करत होता. त्याच्या मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या डोक्यात मागील बाजूने मार लागलेला होता. पाठीवर आणि मानेवर पुसटश्या मारहाणीच्या खुणा दिसून आल्या होत्या. तसेच कानातूनही रक्त आलेले होते.
महत्वाच्या बातम्या
- गारपिटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : आ. संतोष दानवे
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक; अपघातात दुचाकीवरील दोघे ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
