Share

अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा

Published On: 

भंडारा : आमचे सरकार सत्तेवर असताना पेट्रोल दर वाढीच्या मुद्यावर तुम्ही सरकारवर टीका केली होती. आता मोदी सरकार सत्तेत आहेत, पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही मोदी सरकारवर टीका करा. नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही, असा इशाराच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.

यूपीए सरकारवेळी पेट्रोलचे दर वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी टीका केली होती. आता तिच परिस्थिती आहे. देशात पेट्रोलचे भाव शंभरीवर गेले आहेत. असे असताना ते दोघेही काहीच बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या चित्रपटांचे शुटिंग राज्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली होती.

त्यातच आता नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड सिनेमा 18 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा काल झाली आहे. त्यामुळं आता नागपूर म्हणजेच विदर्भातील कथानकावर आधारीत नागराज मंजुळेंच्या या सिनेमाला नाना पटोले विरोध करणार का? याकडे लक्ष लागून आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरनं चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे आणि बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झुंडच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. यांचे जिथे सिनेमे प्रदर्शित होतील तिथे आम्ही काळे झेंडे दाखवून लोकशाही पध्दतीने विरोध करू. आमचे लोक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट पाहणार नाहीत. आम्ही यांना जिथे मिळेल तिथे काळे झेंडे दाखवून आणि लोकशाही पद्धतीने करू. आम्ही कुठल्याही सिनेमागृह बंद पडणार नाही आणि कुठे यांचं शूटिंग बंद पडणार नाही. पण त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याचे भूमिका आमची राहणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!