मुंबई : पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होताना दिसत यावर महाराष्ट्रातूनही राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. निवडणूक निकालानंतर राज्यातल्या भाजप नेत्यांनी ‘ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, चा नारा दिला आहे. त्यावर शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत शब्दात उत्तर दिले आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच आगामी काळात भाजपला पर्याय देण्याबाबत चर्चा करता करू, असेही ते म्हणाले. आगामी अधिवेशनाच्या काळात आम्ही दिल्लीत असू त्यावेळी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढता येईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.
पंजाबमधील काँग्रेसच्या स्थितीबद्दल विचारले असता, पंजाबमध्ये चन्नी यांना मुख्यमंत्री करणे हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. अशी स्थिती राजकीय जीवनात येत असते. 1977 लाही अशीच परिस्थिती आली होती. सर्वच राज्यात काँग्रेस हारली होती. तेव्हा अनेक लोक बोलले की काँग्रेस संपली आहे. मात्र काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच गोव्यात काँग्रेसची ही स्थिती बदलणार याची मला खात्री आहे, असल्याचेही पवारांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

