नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने यासिर शाह याला अंतिम आकरामध्ये न खेलवल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला यासिर शाह सारख्या अनुभवी दिग्गज फिरकीपटूला बाहेर बसवणे योग्य नाही. कारण त्याने पाकिस्तान संघाला अनेक एक हाती विजय मिळवून दिले आहेत.
आफ्रिदी म्हणाला की “यासिर सारखा फिरकी खेळाडू बाहेर बसू शकत नाही. तो पाकिस्तानी न्युज चॅनेल समा टीव्हीवर बोलत होता. पुढे तो म्हणाला, तुमच्याकडे यासिर सारखा सिनियर खेळाडू आहे. ज्याने तुम्हाला एक हाती सामने जिंकून दिले आहेत. तुम्ही त्याला एका एवढ्या मोठ्या संघाविरुद्ध बाहेर बसवता. मला याबद्दल काहीच कळत नाही, की संघात काय चालले आहे. साजिदने चांगले प्रदर्शन केले. मला त्याच्याकडून जास्त अपेक्षा नव्हत्या. कारण पिच खूप स्लो होती.”
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. परंतु या सामन्याचा निकाल लागला नाही त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यातील खराब पिचबद्दल खूप वादही झाले आहेत. तर बऱ्याच दिग्गजांनी या पिच बद्दल संतापही व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

