🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झालाय. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना सपाटून पडली.
गोव्यात आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा एकही उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचला नाही. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना सपाटून पडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले अजून लढाई संपली नाही असे वक्तव्य केले आहे. तसेच राजकारणात, लोकशाहीत जो जिंकतो त्याचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळे ज्या ज्या पक्षाचा विजय झाला त्यांचं मी शिवसेनेकडून अभिनंदन करतो म्हणत अभिनंदन संजय राऊत यांनी केले.
यासह संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला दिलेला आहे. म्हणाले, या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय मिळाला असला तरी त्यांनी विजय पचवायला शिकलं पाहिजे. काहींना विजय पचवता येत नाही. त्यांना अजीर्ण होतं. त्यामुळे त्यांना सांगायचं आहे की विजय पचवा. त्या त्या राज्याच सुडाचं राजकारण न करता, राज्याचं, तिथल्या लोकांचं हित पाहा.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
