Share

Punjab Result 2022: ‘आप’ चे CM कैंडिडेट भगवंत मान कॉमेडियन पासून नेता कसे बनले? वाचा सविस्तर

Published On: 

नवी दिल्ली: आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा दिवस आहे. पंजाब काँग्रेसच्या हातात असतानाही यंदा काँग्रेसचा धोबीपछाड झाला आहे. पंजाबमध्ये ‘आप’ पक्षाने बाजी मारली आहे. दरम्यान आम आदमी पक्षाने भगवंत मान (Bhagwant Mann) यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र त्यांचा एकंदरीत जीवनप्रवासही तितकाच रोमांचक आहे.

जाणून घ्या कोण आहे भगवंत मान?

भगवंत मान यांची आम आदमी पार्टीने पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भगवंत मान हे पंजाबमधून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे एकमेव खासदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही भगवंत मान विजयी झाले होते.आणि त्यानंतर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यात त्यांना यश आले आहे.

राजकारणामुळे परिवाराने सोडली होती भगवंत मान यांची साथ-

भगवंत मान यांनी एकदा एका मुलाखतीदरम्यान राजकारणात प्रवेश करून खूप काही गमावल्याचे सांगितले होते. त्यांनी २०१५ मध्ये पत्नीला घटस्फोट दिला होता.काही काळ ते मुलांच्या संपर्कात होते, मात्र आता मुलंही त्यांच्याशी बोलत नाहीत असं भगवंत मान यांनी म्हटले होते. मी आता माझ्या मुलांशी फोनवर बोलत नाही, तो म्हणाला की मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, यामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावले आहे. असा खुलासा त्यांनी केला होता. दरम्यान निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी संपूर्ण पंजाब आता माझे कुटुंब असल्याचे म्हटले आहे.

करिअरची सुरुवात विनोदी कलाकार म्हणून केली-

दरम्यान भगवंत मान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात विनोदी कलाकार म्हणून केली होती. त्यांनी अनेक स्टेज-शो आणि चित्रपटांमध्ये काम करून स्वत:चे नाव कमावले. पण नंतर आम आदमी पार्टीत सामील झाले. भगवंत मान आता 48 वर्षांचे असून त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आह. जे आता परदेशात राहतात.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!