मुंबई : पहिल्या हंगामाच्या यशानंतर लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) पुन्हा रंगणार आहे. या लीगचा दुसरा हंगाम २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होईल, ज्यामध्ये चार खासगी मालकीच्या फ्रेंचायझी असतील. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण आगामी लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. लीगचा दुसरा हंगाम ओमानमधील मस्कत येथे खेळवला जाणार आहे.
लीजेंड्स लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इतर क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांचे माजी क्रिकेटपटू भारत, आशिया आणि उर्वरित जगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन संघांमध्ये विभागलेले होते. जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेटच्या दिग्गजांना एकमेकांविरुद्धच्या स्पर्धेत खेळताना पाहिले.
”मी लेजेंड्स क्रिकेट लीगचा पहिला सीझन खेळू शकलो नाही पण सीझन दोनसह मैदानावर परतणे खूप छान होईल”, असे सेहवागने सांगितले. इरफान पठाण म्हणाला, ”मी सप्टेंबरमध्ये लीजेंड्स लीग क्रिकेट खेळून पुन्हा अॅक्शनमध्ये येईन. यावेळी काहीतरी नवीन घडणार आहे, त्यामुळे मी ओमानला जाण्यासाठी उत्सुक आहे.” इरफानचा भाऊ युसूफ पठाण म्हणाला, ”सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या अॅक्शनपॅक सीझन दोनसाठी मी माझे शॉट्स परिपूर्ण करत आहे. जानेवारीत मजा आली आणि मी सप्टेंबरसाठी तयार आहे.”
Legends League Cricket is back with 2nd season. https://t.co/bgeR7vnpuW
— CricTracker (@Cricketracker) July 5, 2022
गतवर्षीप्रमाणे यंदाही रवी शास्त्री या लीगचे आयुक्त असतील. शास्त्री म्हणतात, ”दिग्गजांचा कार्निव्हल परत आला आहे. यामध्ये जगभरातील क्रिकेटपटू एकत्र दिसणार आहेत. या खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत क्रिकेटसाठी खूप योगदान दिले आहे. लीगच्या दुसऱ्या सत्रात त्याला खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

