🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत शतक आणि अर्धशतक झळकावल्यानंतर प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, तर स्टार फलंदाज विराट कोहली तीन स्थानांनी घसरून टॉप-१० मधून बाहेर गेला आहे. विराट टॉप १० मधून बाहेर पडण्याची सहा वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.
ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या १४६ आणि दुसऱ्या डावात ५७ धावा केल्या. चांगल्या कामगिरीमुळे सहा स्थानांनी झेप घेत तो पाचव्या स्थानावर पोहोचला. एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध केवळ ११ आणि २० धावा करणारा विराट आपल्या वाईट फॉर्ममध्येच आहे. या कसोटीत इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने दोन्ही डावात शतके ठोकली. कसोटी फलंदाजी क्रमवारीत बेअरस्टो आता दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
Virat Kohli has dropped out of the top ten of the ICC Test batting rankings for the first time since November 2016 ???? pic.twitter.com/EzTzamePYm
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 6, 2022
३२ वर्षीय बेअरस्टो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने त्याच्या शेवटच्या तीन कसोटींमध्ये चार शतके केली आहेत. बेअरस्टोने सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये ६ शतकांसह ५५.३६च्या सरासरीने १२१८ धावा केल्या आहेत. जो रूटने क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडच्या विक्रमाचा पाठलाग करताना रुटने नाबाद शतक (नाबाद १४२) ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
