Share

Vinayak Raut : माझ्यामुळे एकनाथ शिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली हे माझ्या आयुष्यातील मोठं पाप – विनायक राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार’, असं ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच सोमवारी एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यावेळी भाषणादरम्यान शिंदे यांनी तुफान फटकेबाजी देखील केली. यानंतर शिंदे यांच्या या ट्विटवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

विनायक राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायचं. स्वत:च्या हाताने ट्वीट करता येतं का? याचा शोध घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो आहे. आयुष्यातील मोठं पाप झालंय. मी सांगितलं नसत तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती, असं ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना अचानक त्यांच्या हातातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला. यावरूनच कल उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना… काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला लगावला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!