मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. तसेच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात पोहचले आहेत. बंडखोर आमदारांनी मतदार संघात पोहचताच पत्रकार परिषदा घेत शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट करण्यास सुरवात केलीये. शिंदे गटातील नेत्यांच्या निशाण्यावर सध्या शिवसेना खासदार संजय राऊत आहेत. नागपूरचे शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
आशिष जैस्वाल म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारला १७० आमदार असण्याचा अहंकार होता, त्याविरोधात आमदारांनी उठाव केला. त्यामुळे त्यांना खरी जागा दिसली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही केलेला हा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आलं आहे, असं ते म्हणाले.
या सरकारच्या काळात विदर्भावरील अन्याय दूर होण्याची अपेक्षा आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात गेल्या वेळेस सेनेचं एकंही मंत्रीपद नव्हतं, यावेळे सरकार विदर्भाला प्रतिनिधीत्व देणार अशी आशा आशिष जैस्वाल यांनी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या. विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता. मंत्री टक्केवारी मागत असल्याच्या तक्रारी केल्या. पण त्यांनी मंत्र्यांचे कान टोचले नाहीत, अशी कह्णत देखील त्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

