काल भाजपनेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा राहत असलेल्या घराबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.