Share

“भाजप सक्षम पक्ष, काँग्रेसमध्ये काम करू देत नाहीत” ; हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत?

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस साठी काम करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आता काँग्रेसच्या गोटातच चिंता वाढवणारी बातमी आली आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि कॉंग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल आता बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत. स्वतः हार्दिक पटेल यांच्याकडून तसे संकेत मिळत आहेत. हार्दिक पटेल हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असून, पक्षात काम करू देत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी भाजप चे कौतुक देखील केले आहे.

“गुजरातमधील पक्ष नेतृत्वाला कोणी काम करावे असे वाटत नाही. पक्षात काम करू दिले जात नाही. एखाद्याची पक्षासाठी काम करण्याची, संघर्ष करण्याची इच्छा असेल तरी पक्षात ते करू दिले जात नाही. असेच सुरु राहिल्यावर आम्ही पक्षातून लोकांसाठी आवाज उठवणार तरी कसा?” असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे. कॉंग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांची भेट घेऊन हार्दिक पटेल यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. या संदर्भात हार्दिक पटेल यांना पक्षाकडून सार्वजनिकरित्या बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

“विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसला संघर्ष करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून तसे आंम्ही करायला असमर्थ ठरत असू, तर आम्हाला पर्यायांचा विचार करावा लागेल,” असा सूचक इशारा हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिला.

तसेच’ “भाजप हा एक सक्षम पक्ष आहे. त्यांच्याकडे उत्तम नेतृत्व आहे. याशिवाय ते वेळेत आणि योग्य निर्णय घेत असतात” अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी भाजपचे कौतुक केले आहे. मात्र सध्या आपला भाजप प्रवेशाचा कोणताही निर्णय नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!