Share

राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदलणार? औरंगाबाद पोलिसांनी ठेवल्या ‘या’ अटी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या सभेची तयारी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहेत. असे असताना औरंगाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर, सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर सभेची तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचं ठिकाण बदला, अशी अट औरंगाबाद पोलिसांनी ठेवली आहे.

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांना १ मे रोजी नियोजित ठिकाणी सभा घ्यायची असेल तर त्यांना तारीख बदलण्याची सूचना केली आहे. राज ठाकरे यांनी १ मे ला सभेची तारीख जाहिर केली खरी पण १ मे नंतर दोन दिवसांनी रमझान ईद आहे. या सभेत राज ठाकरे यांनी काही आवाहन केल्यास आणि तणाव निर्माण झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या कारणाने रमझान ईदनंतर सभा घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रह करत आहेत. या सभेला एक लाखाहून अधिक लोक जमतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे. आतापासून मराठवाड्यातील विविध संघटनांचे लोक मनसेच्या संपर्कात असून ते सभेला येण्याची तयारी करत आहेत अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरेंची ही सभा औरंगाबादमधील गरवारे स्टेडियमवर घेण्यात यावी,  असेही पोलिसांचे म्हणणे आहेत रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!