Share

MI Vs CSK : धोनीच्या विस्फोटक खेळीवर जडेजाची प्रतिक्रिया; म्हणाला, “विश्वास होता की…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये काल (२१ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात रोमहर्षक सामना रंगला. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेवटच्या ४ चेंडूत १६ धावांची गरज असताना महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) जयदेव उनाडकटवर आक्रमण करत सामना मुंबईच्या हातातून खेचून घेतला. तर  आयपीएल इतिहासात सलग सात सामने गमावणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला. या सामान्यानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने प्रतिक्रिया देत धोनीचे कौतुक केले.

“धोनीने आपल्या जुन्या शैलीप्रमाणे फिनिशरची भूमिका उत्तमपणे पार पाडली. चेन्नईला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. अशा स्थितीत धोनीने जयदेव उनाडकटच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. तो शांत राहिला आणि शेवटच्या चेंडूवर त्याने शॉर्ट फाईन लेगवर विजयी चौकार ठोकला. सामना ज्या प्रकारे पुढे जात होता ते पाहता  आमच्यावर दबाव होता. जगातील सर्वोत्तम फिनिशर क्रीजवर असल्याने दोन्ही संघांवर दबाव होता. पण तो (धोनी) शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला तर आम्ही सामना जिंकू, हे आम्हाला माहीत होते. शेवटचे दोन-तीन चेंडू तो चुकणार नाही असा आम्हाला विश्वास होता आणि सुदैवाने ते घडले.”, असे जडेजाने म्हटले.

दरम्यान चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १५६ धावांचे आव्हान दिले. मुकेश चौधरीच्या (१९ धावांत ३ बळी) भेदक माऱ्यामुळे मुंबईची वरची फळी उद्ध्वस्त झाली. प्रत्युत्तरात मुंबईकडून डॅनियल सॅम्सने ३० धावांत ४ बळी घेत सामन्यात रंगत निर्माण केली, पण शेवटच्या षटकात धोनीने सामना हिरावून घेतला. चेन्नईने ३ गडी राखून स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!