मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (वय ९२) (Lata Mangeshkar) कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांनाही लक्षणे दिसून आली तपासणी केली असता त्या कोरोना पॉझिटीव्ह आल्या होत्या. लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या सुधारत असून त्यांना लवकरच रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याचे डॉ. प्रतीत रामदासी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 27, 2022
राजेश टोपे यांनी सांगितलं की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. लता दिदींचे व्हेंटिलेटर दोन दिवसांपूर्वीच काढलं आहे. त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. लता दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी विठ्ठलाला साकडे घातल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला होता. ज्याला कोविड न्यूमोनिया असेही म्हणतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्येच दाखल असून पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांनी देवालाही जातीचा दाखल देऊन टाकला-जितेंद्र आव्हाड
- “…तर दंड घेण्याचा अधिकार सरकारला राहील का?”, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सवाल
- अभिजित बिचकुलेच्या ‘त्या’ वक्तव्यावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या सलमानबाबत..”
- “आराम आणि टाईमपास… काम करायला केंद्र सरकार आहेच”, आ.भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका
- कोण कोणामुळे वाढले यापेक्षा दोघांनाही एकमेकांचा फायदा झाला हे स्वीकारणे महत्त्वाचे- संजय राऊत


