मुंबई: बिग बॉसमधून अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अभिजीतने सलमान खानबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. “सलमानसारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि गल्ली झाडायला लावीन”, असे बिचुकले यांनी म्हटले होते. आता यावरूनच वाद रंगला असताना अभिनेत्री राखी सावंतने ( Rakhi Sawant Criticism)यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंतने म्हटले आहे की, ‘बिचुकले ने समाधी घेतली आहे. माझ्या सलमानबाबत या जगात कूणी काही बोलत असेल तर राखी सावंत त्यांचा बैंड वाजवेल’ असे म्हटले आहे. सोबतच राखीचे पती रितेश यांनीही बिचकुलेचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान राखी बिग बॉस १५ च्या फिनालेमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने सलमानबाबत बिचकुलेने दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
कोण आहे अभिजित बिचकुले?
नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणारा भारतातील एकमेव व्यक्ती म्हणून ओळख असलेला अभिजीत बिचुकले हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान मी होणार असे अनेकवेळा सांगितले आहे. त्यांनी अशी अनेक वक्तव्ये यापूर्वीही केली आहेत. मात्र आता त्यांनी सलमान खानशीच पंगा घेतल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या:
- कोण कोणामुळे वाढले यापेक्षा दोघांनाही एकमेकांचा फायदा झाला हे स्वीकारणे महत्त्वाचे- संजय राऊत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने भाजपला झोंबल्या मिरच्या- संजय राऊत
- “काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य”
- रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी IAS अधिकाऱ्याला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

