मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे विधान टोपे यांनी केले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘अहो राऊत साहेब MIM सुघ्दा लाचार म्हणायला लागले. राजेश टोपेंनी सांगितल महाविकास आघाडीत घ्यायचा निर्णय वरिष्ठ घेतील. महाविकास आघाडी घडविताना तुमचा सहभाग पण आता तुम्हाला न विचारताच? आता MIM लाचार म्हणते तर टोपे वरिष्ठ निर्णय घेतील सांगून मोकळे होतात’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.
अहो राऊत साहेब MIM सुघ्दा लाचार म्हणायला लागले. राजेश टोपेंनी सांगितल महाविकास आघाडीत घ्यायचा निर्णय वरिष्ठ घेतील. महाविकास आघाडी घडविताना तुमचा सहभाग पण आता तुम्हाला न विचारताच? आता MIM लाचार म्हणते तर टोपे वरिष्ठ निर्णय घेतील सांगून मोकळे होतात. pic.twitter.com/uFBpDJ10oZ
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 19, 2022
दरम्यान, एमआयएमला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. तसेच जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी फक्त प्रस्ताव ठेवला. मी फक्त ऐकून घेतलं. दॅट्स ऑल, असेही राजेश टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- वकील-डॉक्टर-इंजिनियरपासून शेतकरी, पंजाबच्या मंत्र्यांबद्दल सर्व काही जाणून घ्या…
- विराट सोबतचे वाद विसरत गंभीरने केले कौतुक; म्हणाला “तो १०० शतक…”
- “AIMIM ने भाजपविरोधी भूमिका दाखवली तर…”; इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया!
- Women’s WC 2022 : मितालीचा अजूनही क्रिकेटवर ‘राज’ ; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रचले रेकॉर्ड!
- “जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती”, राजेश टोपेंची माहिती


