Share

योगी आदित्यनाथांनी देवालाही जातीचा दाखल देऊन टाकला-जितेंद्र आव्हाड

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. देवानेही वारंवार याच जातीत जन्म घेतला. आपल्या या जातीवर स्वाभीमान असायला पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एवढंच राहिलं होतं. देवालाही त्यांनी जातीचा दाखला देऊन टाकला.’ असे जितेंद्र आव्हाढ म्हणाले आहेत.

तुमच्यावर अशी टीका होतेय की तुम्ही केवळ राजपुतांसाठी राजकारण करता, यावर तुम्हाला कधी दु:ख होतं का? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, काही दु:ख होत नाही, क्षत्रिय जातीत जन्म घेणे म्हणजे गुन्हा आहे का? या देशातील अशी जात आहे ज्या जातीत देवानेही जन्म घेतला आहे. आणि वारंवार त्याच जातीमध्ये देवाने जन्म घेतला आहे. आपल्या जातीवर स्वाभीमान असायला पाहिजे. असे उत्तर योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, आम्ही ४३ लाख घरकुल बनवले आहे. यात क्षत्रिय एक टक्काही नाही. १ हजारही नसेल. ४३ लाख घरकुल हे गरीब, मागास, दलित, अल्पसंख्यांक यांच्यासाठीच बनवण्यात आले आहेत. असेही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!