🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात केदार शिंदे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘वाईन आणि दारू, यात फरक आहे असं सरकारचं म्हणणं आहे. तर मग लोकं वाईन पिऊन गाडी चालवल्यावर दंड घेण्याचा अधिकार सरकारला राहील का?’, असा सवाल शिंदे यांनी केला आहे. तसेच या ट्विटसह त्यांनी #मलापडलेलाप्रश्न या हॅशटॅगचा वापर केला आहे.
#वाईन आणि #दारू, यात फरक आहे असं सरकारचं म्हणणं आहे.. तर मग लोकं वाईन पिऊन गाडी चालवल्यावर दंड घेण्याचा अधिकार सरकारला राहील का?? #मलापडलेलाप्रश्न
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) January 29, 2022
अतिशय लज्जास्पद!
विशिष्ट कंपन्यांना मदतीसाठी सुपरमार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी मविआने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे. पालघर जिल्ह्यात गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला काय घडले पहा.
रुग्णवाहिका नसल्याने दुर्दैवी पित्याला 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून न्यावा लागला.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2022
वाह रे सरकार तेरा खेल..सस्ती दारु महंगा तेल
करप्शन करने पर कुर्सी और बोलने पर जेल..
महिला सुरक्षा पर चुप और अपराधियो से मेल..
तीनो पार्टियां अब वाइन करेंगी राशन दुकानों पर सेल..
वाह रे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल..#जब_मिल_बैठेंगे_तीन_यार#सरकार_बेवड़ा_और_ठेकेदार
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022
दरम्यान, भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis), भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh), विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारच्या निर्णयावरून जोरदार टीका केली होती. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आदींनी वाईन आणि दारू, यात फरक आहे, असे म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य”
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने भाजपला झोंबल्या मिरच्या- संजय राऊत
-
कोण कोणामुळे वाढले यापेक्षा दोघांनाही एकमेकांचा फायदा झाला हे स्वीकारणे महत्त्वाचे- संजय राऊत
-
“आराम आणि टाईमपास… काम करायला केंद्र सरकार आहेच”, आ.भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका
-
अभिजित बिचकुलेच्या ‘त्या’ वक्तव्यावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या सलमानबाबत..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
