Share

“आराम आणि टाईमपास… काम करायला केंद्र सरकार आहेच”, आ.भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

Published On: 

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जलविहार आणि धरण पाहण्यात इतके रमले की ते बैठकीला जाण्याचे विसरले होते. त्यांनी दिवसभरात दोनदा बोट क्लबवर धरणात भ्रमंती केली. नाशिक येथील विभागीय आढावा बैठकीचे नियोजन होते. मात्र आदित्य ठाकरे यांना विसर पडल्याने ही बैठक स्थगित करावी लागली होती. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

यावर भाजपनेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली आहे. ‘जलविहार, आराम, टाईमपास… काम करायला केंद्र सरकार आहेच’, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

शुक्रवारी औरंगाबाद दौरा आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. नियोजित दौऱ्यानुसार त्यांनी नाशिक महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दोन उड्डानपुलांची पाहणी केली. या उड्डान पुलासाठी वृक्षांची कत्तल होत असल्याने त्याला विरोध होत आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचनाही केल्या. त्यानंतर ते गंगापुर धरणाची पाहणी करण्यासाठी गेले.

या धरणात जलविहार करताना धरणाचे सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंना दिवसभरात दोन वेळा जलविहार करण्याचा मोह झाला. ते जलविहारात रमल्याचे पाहूण अधिकाऱ्यांनीही त्यांना बैठकीची आठवण करुन दिली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!