🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील ‘बेस्ट’ प्रशासनातर्फे ’ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आलेले तब्बल २ हजार १०० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रद्द करण्याची मागणी भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. या मागणीचे एक पत्र त्यांनी लिहले असून ते पत्र ट्विट देखील केले आहे. यावर आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.
“आज बेस्ट बसेसबाबत जो निर्णय घेतला तो योग्य नाही. या बसेसमुळे प्रवासी वाढले आहेत, तसेच प्रशासनाला होणार फायदा वाढलेला आहे. आणि ते कंत्राट रद्द करण्याचा निर्णय चालू आहे. यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेले सगळे निर्णय चुकीचे असल्याचं भासवलं जातंय. त्यामुळे जरा लोकांचा विचार करा. या बसेसमुळे लोकांना फायदा झालेला आहे किंवा तो कंटिन्यू कसा राहील, हे बघितलं पाहिजे”, असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.
काय लिहलं आहे पत्रात?
या पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की, “ ‘बेस्ट’ ने नव्या २ हजार, १०० ‘ई-बस’ खरेदी करण्याचे कंत्राट ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले असून ही कंत्राटाची निविदा प्रक्रिया चुकीची असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यानंतरही ‘बेस्ट’ने हे कंत्राट रद्द केलेले नाही. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही न करता हे कंत्राट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा”.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : ख्रिस गेलनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरेल जगातील पहिला फलंदाज; वाचा!
- Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
- Rakhi Sawant | “ललितजी क्या हात मारा है”; राखी सावंतची सुष्मिता आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया
- Virat kohli : “७० शतकं झळकावणाऱ्या विराट कोहलीला वगळण्याचा…”; शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
