Share

Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात जाऊन मिळाल्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच भूमिकेबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी एक सुचक विधान केले आहे.

आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र येत असतील, तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे मत विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भांत सकारात्मक भूमिका घेतली असेल, तर तिन्ही पक्षांचे वरीष्ठ नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील. कारण सध्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन अधिकाधिक नगराध्यक्ष निवडून आणणं, ही आता काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. तसेच वरीष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो तिन्ही पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मान्य असेल”, असे मत देखील त्यांनी मांडले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!