महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने नुकतीच अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. ललित मोदी यांनी त्या दोघांचे रोमँटिक फोटो ट्विट केल्यानंतर त्या दोघांच्या नात्यावर आणि लग्नाविषयी अनेक चर्चा होत आहेत. आता यावरच अभिनेत्री राखी सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/tv/CgCth1xMQBW/?utm_source=ig_web_copy_link
राखी सावंतला जेव्हा सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने हसत हसत उत्तर दिले कि, “व्वा ललित जी काय हात मारला आहे. डायरेक्ट सुष्मिता सेन. खरे तर जेव्हा मी ललितजी आणि सुष्मिता यांना पाहिले तेव्हा मला ते वडील आणि मुलगी असल्यासारखे वाटतात. सुष्मिता माजी मिस युनिव्हर्स आहे पण ललित कोण आहे? तसेच पुढे ती असेही म्हणाली कि, पैसे घेऊन पळून गेलात म्हणल्यावर मोठी हिरोईन मिळणारच ना. आजकाल पैसे नसतील तर कोणी विचारत नाही. त्याचबरोबर आजकाल कुणीही माणसाचे विचार आणि त्याचा चेहराही पाहत नाही. सगळेजण फक्त पैसे पाहतात” तसेच पुढे राखी असेही म्हणाली की, राखी सावंत अशी नाही. राखी फक्त खऱ्या प्रेमाच्या मागे जाते. पैशाच्या मागे नाही.
महत्वाच्या बातम्या:
- Virat kohli : “७० शतकं झळकावणाऱ्या विराट कोहलीला वगळण्याचा…”; शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
- Chhagan Bhujbal | सरपंच जनतेतून मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का? ; छगन भुजबळ यांचा सवाल
- Gunratna Sadavarte | “काँग्रेसच्या जातीय विचारांची मी निंदा करतो” – गुणरत्न सदावर्ते
- Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीसांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडावा – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

