Share

Virat kohli : “७० शतकं झळकावणाऱ्या विराट कोहलीला वगळण्याचा…”; शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत त्याच्या बाजूने बोलणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कमी नाही. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांनीही आपापल्या पद्धतीने कोहलीच्या बाजूने बोलले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही विराट कोहलीच्या समर्थनार्थ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावणाऱ्या खेळाडूला डावलण्याबाबत लोक कसे काय बोलू शकतात, असे शोएब अख्तरचे मत आहे.

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, ‘मी विराट कोहलीबद्दल खूप टीका ऐकत आहे. लोक मला सांगत आहेत की कोहली संपला आहे. तो आता काहीही करू शकणार नाही आणि मी त्यांना सांगतो. कोहली गेल्या १० वर्षातील जगातील सर्वात महान खेळाडू आहे. आता गेल्या १-२ वर्षांत तो खराब कामगिरीतून जात आहे. परंतु त्याने धावा केल्या नाहीत असेही नाही.”

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “विराट कोहलीला वगळण्याबाबत लोक कसे विचार करू शकतात हे मला समजत नाही. मी कपिल देव यांचा आदर करतो. विराटबाबतचे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ते एक महान खेळाडू आहेत म्हणून ते असे म्हणू शकतात. परंतु इतर कोणीही असे म्हणू शकत नाही. शोएब म्हणाला की, “पाकिस्तानी असल्याने मी विराट कोहलीला पाठिंबा देतो कारण ७० शतके ठोकणे ही काही छोटी कामगिरी नाही. ही कामगिरी महान खेळाडूच करू शकतात.” विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळल्यानंतर एक महिना क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत विराट कोहलीची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्याच्या या खराब कामगिरीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विराटने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतरच्या तीन वर्षात आतापर्यंत त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. विराटचा हा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंताजनक ठरत आहे. आगामी काळातील आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये विराट सारख्या खेळाडूचा भारताच्या यशामध्ये खूप मोठा वाटा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!