Share

जुन्या भांडणातून वृद्धाचे अपहरण, ८ जणांवर गुन्हा

Published On: 

🕒 1 min read

बीड : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका वृद्धाचे अपहरण करून बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी, हाडबेवाडी शिवारात ३ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मंचक रामराव दराडे (७० रा. दरडवाडी ता. अंबाजोगाई) असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दराडे हे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या दरम्यान हाडबेवाडी पाटी येथे रस्त्यावर थांबले होते. यावेळी जुन्या वादाच्या कारणातून आणि दवाखान्यात झालेला १२ लाखांचा खर्च दे किंवा तुझ्या नावावरील जमीन आमच्या नावावर करून दे असे म्हणत सिद्धेश्वर दराडे व इतरांनी त्यांचे पीकअपमधून (एमएच ४४ यू १०१४) अपहरण करून त्यांना दरडवाडी येथे आणले. सिद्धेश्वर दराडे यांच्या घरासमोरील विजेच्या खांबाला बांधून ठेवून जबर मारहाण केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या प्रकरणी सिद्धेश्वर बालाजी दराडे, महादेव बालाजी दराडे, शिवाजी बाबूराव दराडे, अर्चना सिद्धेश्वर दराडे, उषा महादेव दराडे, कौशल्या बालाजी दराडे (सर्व रा. दरडवाडी ) आणि प्रल्हाद ऊर्फ प्रदीप कांगणे, ज्ञानेश्वर रामदास चाटे (रा. खापरटोन ता. अंबाजोगाई) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!