Share

दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची होणार बचत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जागतिक तापमान वाढ आणि वाढते प्रदूषण या मोठ्या पर्यावरण विषयक समस्या सध्या जगासह देसाहाला भेडसावत आहेत. त्यामुळे यावर नवनवीन उपाय योजनाच्या सहाय्याने मात करण्याची गरज आहे. यामध्ये मुख्यतः ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांन संबंधित खबरदारी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

ग्राहकांना परवडेल अशा कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. तर लोकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं, प्रामुख्याने ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापराव्यात, यासाठी दिल्ली सरकारने पुढाकार घेतला आहे.

दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी ‘तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.’

त्याचबरोबर ‘टू-व्हीलर सेगमेंटसह आम्ही ‘स्विच दिल्ली अभियाना’ची सुरुवात करत आहोत. ग्राहकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभांचादेखील यामध्ये समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या एका दुचाकी वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सरासरी 1.98 टन कमी कार्बन उत्सर्जन करेल. 11 झाडं लावल्यानंतरच हे शक्य होतं.’ यायाच अर्थ तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर 11 झाडं लावल्यानंतर पर्यावरणाचा जितका फायदा होतो, तितकी पर्यावरणाची मदत तुम्ही करु शकाल

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!