बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. आता तर चक्क पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान दिल आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. समाजातील “बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद” या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची इथे विशेष उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे गंभीर विधान केलं आहे. त्यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या की काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया?
नरेंद्र मोदी यांच्याबाबत पंकजा मुंडे काय बोलल्या हे त्यांना विचारल्यावर कळेल. पंकजा मुंडे त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाहीत हे मी सांगू शकत नाही. हे त्यांनी स्वत: व्यक्त केल्यावर कळेल.
राजकारणात स्वच्छता आणायची आहे- पंकजा मुंडे
आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेश मंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा, अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही, असं मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | “दीदी जिथे असतील तिथे…”, लता मंगेशकरांच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंची भावूक पोस्ट
- Bacchu Kadu | बच्चू कडूंना राग अनावर! ‘ऐकून घे आधी’, म्हणत स्थानिकाच्या लगावली कानशिलात
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी अन् अमित शहांची लागणार उपस्थिती?
- Mahesh Babu | दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर दुःखाचा डोंगर!
- Eknath Shinde | भारतात PFI वर बंदी! एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…


