Share

अमित शाहांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं; हसन मुश्रीफांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं काल सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी, अमित शाह यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघात केला होता.

आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘त्यांनी महाविकास आघाडीवर वैफल्य मनस्थितीमुळे टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, हे समजल्यामुळेच त्यांनी आता तक्रारी सुरु केल्या आहेत,’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली. अमित शाह यांनी भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे असा आरोप केला होता.

हा आरोप मुश्रीफांनी खोडून काढला आहे. ‘कारखानदारांना त्रास दिला जातो हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं. त्यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थक हमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपच्या एका तरी कारखानदाराने सांगावं की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत.’ असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!