🕒 1 min read
औरंगाबाद: एसटी विलीनीकरणाची आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. मात्र रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे काही प्रमाणात एसटीची चाके रुळावर येत आहेत. गुरुवारी १४१ (दि.६) ३७३ बस धावल्या असून ९९०२ प्रवाशांनी प्रवास केला. सोमवार पर्यंत पुढील सुनावणीसाठी तारीख मिळण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहावे असे आवाहन अॅड. गुणरत्न सदावर्ते(Gunratna Sadavarte) यांनी केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज (दि.५) अंतिम सुनावणी होणार होती. मात्र एक न्यायाधीश पॉझिटिव्ह आले तर दुसऱ्या न्यायाधीशांची बदली झाल्यामुळे ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. पुढची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या संपावर ठाम राहावे असे आवाहन वकिलपत्र घेतलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील मध्यवर्ती तसेच सिडको बसस्थानकातील कर्मचारी अजूनही दुखवट्यावर ठाम आहेत.
पुढची तारीख कधी मिळेल याची कर्मचारी वाट पाहत आहेत. मात्र प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वारंवार रुजू होण्याचे आवाहन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी आवाहनाला धुडकावून लावल्याने पुन्हा एकदा औरंगाबाद विभागात १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर मंगळवारपर्यंत आणखी ५० नवे कर्मचारी रूजू झाले असून आता एकूण रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जिल्हाभरात ८५० वर पोहोचली आहे. आणखी ५० कर्मचारी रुजू झाल्याने एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. आज १२३ बसच्या ३२६ फेऱ्या करण्यात आल्या. यामध्ये जालना, बीड, गेवराई, उस्मानाबाद, अंबाजोगाई आदी मार्गांवर आता बस धावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
- भाजपचा अजून एक दावा ठरला फोल? काँग्रेसने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले,’पंजाब माफ नाही करणार’
- “मुख्यमंत्री ठाकरे योग्य निर्णय घेतली आणि कोरोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
