Share

मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी उद्घाटनानंतर आपल्या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेवर लक्ष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सेनेला खडेबोल सुनावले. जनमताचा अनादर करत, पवित्र युती सोडून शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असे शाह यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ‘ऑटोरिक्षा’ सरकार असा केला. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून, या ऑटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शाह म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाही दावा शाह यांनी केला. जनतेने जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, डंके की चोट पर करता हूँ. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.

अमित शाह म्हणाले, “जर असं मानलं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं, तर मग शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या बॅनरवर तुमच्यापेक्षा दुप्पट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा फोटो लागत होता. मोदींचा फोटो वापरुन निवडणूक लढली. माझ्यासोबत आणि मोदींसोबत तुमची रॅली झाली. प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हटलं की एनडीएचं सरकार बनवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी उद्धव ठाकरे का बोलले नाही? असं कोणतंच बोलणं झालं नव्हतं. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व मुल्यांना तापी नदीत विसर्जित करुन ते सत्तेवर बसलेत.”

दरम्यान, शिवसेनेने देखील या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.’ठाकरे कुटुंब नेहमीच खरे बोलते.खा.अरविंद सावंत याबाबत म्हणाले, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये ५०-५०चे सूत्र ठरलेले होते. अमित शहांनीच हे सूत्र घोषित केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच ही फसवणूक झाली. मात्र फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, म्हणूनच त्यांना पुढील पाऊल उचलावे लागले, असे अरविंद सावंत म्हणाले. जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणाला गेले? अशावेळी त्यांनी मुंबईला यायला हवे होते. असे असताना मग ते मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत, असा सवालही सावंत यांनी केला.

सावंत यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरीही प्रत्येक ठिकाणी भाजप नेते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते शाह हे सर्व जाहीर सभेत एनडीएचं सरकार बनवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगत होते त्यावेळी उद्धव ठाकरे का बोलले नाही? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर काही शिवसेना नेते देताना दिसत नाहीत.मुख्यमंत्रीपदाबाबत जाहीरपणे एखादा पक्ष असा प्रचार करत असलेला पाहून वचन घेतलेला दुसरा पक्ष का गप्प बसला हे न उलगडणारे कोडे आहे.

आता या दोन्ही पक्षांमध्ये नेमके खरे कोण बोलत आहे याचे उत्तर सहजासहजी जनतेला मिळेल असे वाटत नाही कारण ज्या बंद खोलीतील वचनाबाबत दोन्ही बाजूचे नेते बोलत असतात त्या ठिकाणी मोजकेच नेते उपस्थित होते . आगामी काळात फक्त या भावनिक मुद्द्याचा केवळ राजकारणासाठी उपयोग केला जाईल अशी चिन्हे आहेत. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नेत्यांपैकी आता नेमके खरे कोण बोलत आहे हे गुपित आगामी काळात देखील कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!