Share

दगडफेक प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

Published On: 

🕒 1 min read

बीड : २००८ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळीत राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी बीड येथील परळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले असून जामीन मिळूनही दिलेल्या तारखांना हजर न राहिल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

२२ ऑक्टोबर २००८ रोजी मुंबईमध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. तद्पश्चात या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. तसेच राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमधील अंबाजोगाई येथे एसटी बसची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा कलम 143 427 336 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, त्यानंतर राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला. परंतु, जामीन मिळूनही दिलेल्या तारखांना हजर न राहिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे-पावडे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!