Share

अंबाजोगाईतील रस्ते कामात मोठा घोटाळा; मुख्य सूत्रधाराचा अटकपूर्व जामिन औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या मनरेगा अंतर्गत रस्त्याच्या कामात १७ लाखांचा अपहार करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहशिक्षक असलेल्या दिनकर वसंतराव लव्हारे(Dinkar Lavhare) याचा अटकपूर्व जामिन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती प्रकाश नाईक(Prakash Naik) यांनी फेटाळून लावला. तर याच प्रकरणात अभियंत्यासह पोस्टमनला अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या रस्त्याचे काम सन २०१४-१५ दरम्यान मंजूर करण्यात आले होते. या कामात अपहार झाल्याची तक्रार प्रभावती भीमराव कांबळे, नारायण लव्हारे, सत्यपाल रामभाऊ वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती. प्रशासनाच्या समिती मार्फत चौकशी करण्यात आली. दरम्यान, पट्टीवडगाव ते फावडेवाडी या रस्त्याच्या कामास रोजगार हमी योजनेअंतर्गत अंबाजोगाईचे तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी मंजुरी दिली होती. हे रस्त्याचे काम परळी येथील नागेश्वर विद्यालय येथे सहशिक्षक असलेल्या दिनकर लव्हारे याने गुत्तेदार असल्याचे भासवून स्वतः केले. मुळात या कामाचे अंदाजपत्रक जि.प. बांधकाम उपविभागाचे उप अभियंता मिलिंद चव्हाण यांनी चुकीचे बनविले होते.

दिनकर लव्हारे याच्याशी संगनमत करून चुकीची बिले सादर केली, तर त्याला खातेधारकांच्या परस्पर पैसे उचलून देण्यास पोस्टमन पंडित पोपळे यांनी मदत केली. या प्रकरणात अंबाजोगाईचे नायब तहसीलदार दत्तात्रय सरोदे यांच्या फिर्यादीवरून १६ सप्टेंबर २०२१ रोजी बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपींचा अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणात मुळ तक्रारदारांतर्फे अॅड. सचिन बी. मुंडे तर शासनातर्फे अॅड. डी.आर. काळे यांनी काम पाहिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!